अशी झाली हत्या : या घटनेनंतर पोलिसांनी मुल्ला यांच्या घरसमोर बंदोबस्त ठेवला आहे. या घटनेचे पडसाद कुठे उमटू नये म्हणून पोलीस अलर्ट मोडवर आहेत. घटनेनंतर पोलिसांनी लगेच तपासकार्य सुरू केले आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजता नालसाब मुल्ला हे आपल्या घरासमोर उभे होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मुल्ला हे आपल्या घरासमोर उभे होते. त्याचवेळी बुलेटवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार केले आणि आठ गोळ्या झाडल्या. या गोळीबाराचे आवाज आल्यानंतर मुल्ला यांचे कुटुंबीय आणि इतर नागरिक घराबाहेर आले. त्यावेळी मुल्ला जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मुल्ला यांचा मृत्यू झाला. मुल्ला यांच्या पोटावर आणि छातीवर पाच गोळ्या लागल्या होत्या. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
Sangli Murder Case : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची घरासमोरच आठ गोळ्या झाडून हत्या, हत्येपूर्वी काय घडलं? - नलसाब मुल्ला यांच्यावर चाकूहल्ला
सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. ही हत्या आधीच्या वादातून झाली असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
गुन्हेगारी इतिहास : नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रीय कार्यकर्ते होते. पण त्यांची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची होती. त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होते. यामुळे मुल्ला यांचा खून हा आधीच्या गुन्ह्यातील वादातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुल्ला यांच्यावर आधी खासगी सावकारीसह इतर गुन्हे दाखल होते. दोन-तीन वर्षापूर्वी 100 फुटी रस्त्यावरील एका टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, त्यात मुल्लाचा समावेश होता. हत्येच्या रात्री मुल्ला आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी त्यांचा बुलेटवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांसोबत वाद झाला. ते एकमेकांना शिवीगाळ करू लागले. त्यानंतर हल्लेखोरांनी आठ गोळ्या मुल्ला यांच्यावर झाडल्या. यात मुल्ला गंभीर जखमी झाले होते.
हेही वाचा