सांगली- महापुराच्या स्थितीत बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय सांगलीतील मुस्लिम समाजाकडून घेण्यात आला आहे. कोणतीही कुर्बानी न करता केवळ नमाज पठण करून साध्या पध्दतीने यंदाची बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. तसेच इतर ठिकाणच्या मुस्लिम समाजाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे, यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
सांगलीत महापूर : बकरी ईद साजरी न करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय - मुस्लिम समाजाचा निर्णय
मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी एकत्रित येत साध्या पद्धतीने बकरी ईद साजरी करावी, तसेच पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने केला आहे.
बकरी ईद साजरी न करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय
सांगलीतल्या महापुरामुळे जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णाकाठी भीषण परस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोकांचे संसार या महापुरात उध्वस्त झाले आहेत. सांगली शहरात ही मोठ्या प्रमाणात या महापुरामुळे अनेक नागरिकांचे संसार पाण्यात बुडाले आहेत. अजूनही या महापुराची भीषणता कायम आहे.