सांगली - नेहमी स्टेजवर आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांना सांगलीमध्ये भर रस्त्यावर उतरून कला सादर करण्याची वेळ येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी उठवण्यासाठी कलाकारांनी संगीतमय पद्धतीने निषेध नोंदवला.
सांगलीत गायकांचे संगीतमय पध्दतीचे आंदोलन - सांगली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. नाट्यगृह व इतर सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहे.त्यामुळे स्थानिक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून कार्यक्रम देण्यात येत नाही त्यामुळे राज्य सरकारचा निषेध म्हणून सांगलीत रविवारी कलाकार संघटना भाजपा संस्कृतीला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
संगीतमय पध्दतीचे आंदोलन