महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वारणानगर नऊ कोटी चोरी प्रकरण : सांगलीत मुख्य संशयिताचा पाठलाग करून निर्घृण खून - सांगली खून बातमी

पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या वारणानगर येथील 9 कोटी चोरीतील प्रमुख संशयिताचा थरारक पाठलाग करून सांगलीत निर्घृण खून करण्यात आला आहे.

murder
सांगलीत खून

By

Published : Jan 30, 2021, 2:08 AM IST

Updated : Jan 30, 2021, 3:52 AM IST

सांगली - पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या वारणानगर येथील 9 कोटी चोरीतील प्रमुख संशयिताचा थरारक पाठलाग करून निर्घृण खून करण्यात आला आहे. थरारक पाठलाग करून शहरातील गणेशनगर येथे हा खून करण्यात आला आहे. मैनुद्दीन मुल्ला,असे या मृताचे नाव आहे. सांगलीमध्ये भरदिवसा झालेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

वारणानगर नऊ कोटी चोरी प्रकरणातील मुख्य संशयिताचा सांगलीत खून

थरारक पाठलाग करून भरवस्तीत खून

सांगली शहरातल्या गणेशनगर येथील अलिशान चौक या ठिकाणी मैनुद्दीन मुल्ला या व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. थरारक पाठलाग करून मुल्ला याचा भरवस्तीमध्ये रात्री 9 च्या सुमारास खून करण्यात आला आहे. एका घरामध्ये घुसलेल्या मुल्लावर चार ते पाच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार केले. त्यामध्ये तो जागीच ठार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तर खुनाच्या घटनेनंतर याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

9 कोटी चोरीतील प्रमुख संशयित

पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या 9 कोटी चोरी प्रकरणात मृत मैनुद्दीन मुल्ला हा प्रमुख संशयित आरोपी होता. 2016 मध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या वारणानगर या ठिकाणी एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात नऊ कोटी चोरीचा प्रकार घडला होता. त्यानंतर मिरजेतील बेथेलहेम नगर येथील मुल्ला याच्या झोपडीवजा घरात 9 कोटींची रोकड सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, चोरीच्या घटनेमध्ये सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, सहा सात पोलीस कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. तर मैनुद्दीन मुल्ला हा सध्या जामिनावर बाहेर होता.

हेही वाचा -मे ते जून महिन्यामध्ये मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 मार्ग सेवेत - मुख्यमंत्री

हेही वाचा -राममंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये, केशव उपाध्ये यांचा टोला भाजपा प्रवक्ते केशव उपा

Last Updated : Jan 30, 2021, 3:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details