धोत्रेवाडी (सांगली) -वाळवा तालुक्यातील धोत्रेवाडी गावातील विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर गेली वीस दिवसापासून बंद आहे. यामुळे पाण्याची व्यवस्ठा नसल्यामुळे पिके वाळत आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर गावातील पाणी पुरवठा योजने जवळील डीपीवरील ट्रांसफार्मर जळाल्याने चार दिवस वाट पाहून स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी कासेगाव येथील सबस्टेशन व इस्लामपूर कार्यालयात जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत सुरु करण्याची वेळोवेळी मागणी केली होती. 28 दिवसानंतर दुसरा ट्रांसफार्मर बसवण्यात आला. मात्र, तोही नादुरुस्त असल्याने सध्या बंद अवस्थेत आहे.
सांगली : शेतीसाठी वीज पुरवठा करणारा महावितरणचा ट्रांसफार्मर एक महिन्यापासून बंद - महावितरणचा ट्रांसफार्मर
गावातील पाणी पुरवठा योजने जवळील डीपीवरील ट्रांसफार्मर जळाल्याने चार दिवस वाट पाहून स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी कासेगाव येथील सबस्टेशन व इस्लामपूर कार्यालयात जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत सुरु करण्याची वेळोवेळी मागणी केली होती. 28 दिवसानंतर दुसरा ट्रांसफार्मर बसवण्यात आला. मात्र, तोही नादुरुस्त असल्याने सध्या बंद अवस्थेत आहे.
सध्या कोरोनामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या हजगर्जीपणाच्या झळा सोसावे लागत आहेत. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असताना आता शेतीला पाणी नसल्याने पिके करपू लागली आहेत. यामुळे उत्पनात घट होऊन चालू हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना कारवा लागणार आहे. संबधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ट्रांसफार्मर तातडीने बसवून द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा -'आम्हाला 2 हजार 280 मतदारांची साथ; गोकुळ व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या हातात जाईल'