सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत आज भाजपने विजय संकल्प मोटार सायकल रॅली काढली. या रॅलीतून पक्षाची ताकद दाखवण्यात आली. पलूस-कडेगाव तालुक्यात निघलेल्या रॅलीत शेकडो मोटरसायकल घेऊन भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सांगलीत भाजपची विजय संकल्प मोटार सायकल रॅली - sankalp
सांगलीच्या पलूस तालुक्यातील औदुंबरमधून आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने विजय संकल्प मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
सांगलीच्या पलूस तालुक्यातील औदुंबरमधून आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने विजय संकल्प मोटार सायकल रॅली काढण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही मोटार सायकल रॅली निघाली. या मोटार सायकल रॅलीत पलुस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून भाजपने ५ वर्षात केलेल्या कामाचा जल्लोष साजरा केला. आज राज्यभर अशा पद्धतीने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपकडून मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.