सांगली-एका तेरा दिवसाच्या नवजात बालकाचा आईने खून केल्याचा प्रकार घडला आहे. आजाराने त्रस्त झालेल्या बालकाची अवस्था पाहवत नसल्याने आईने बाळाचे जीवन संपवून टाकले. पलूस तालुक्यातील भिलवडीच्या माळवाडी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात ऐश्वर्या माळी या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
13 दिवसांच्या बाळाला टाकले पाण्यात
ऐश्वर्या अमितकुमार माळी यांनी 13 दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. पण काही दिवसात त्या बाळाला शौचाचा आजार झाला. त्यानंतर माळी कुटुंबियांनी सांगलीतील एका खासगी रुग्णालयात बाळाचे ऑपरेशन केले. ऑपरेशन नंतर बाळाचं शौच साफ होण्यासाठी बाळाच्या पोटातून नलिका बाहेर काढण्यात आली होती. त्यामुळे बाळाला वेदना होत होत्या. बाळाला होणारा त्रास बघवत नसल्याने नैराश्यातून ऐश्वर्या माळी यांनी छतावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीत बाळाला टाकून त्याचे आयुष्य संपवले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नवजात मुलाच्या आईवर गुन्हा दाखल