सांगली : करणी-भानामती असे प्रकार समाजात दिसून येत आहेत. जतच्या कुणीकोनूर येथील मायलेकींच्या झालेल्या हत्ये प्रकरणी धक्कादायक उलगडा झाला आहे. मायलेकीच्या खून प्रकरणात आरोपी वेगळेच निष्पन्न झाले आहेत. करणी केल्याच्या संशयातून मायलेकींचे ही त्यांच्याच भावकीतील तरुणांनी केल्याचे उमदी पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उमदी पोलिसांनी दोघांना अटक केले असून एक जण फरार आहे. अशी माहिती उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार यांनी दिली आहे.
कुणी कोनूर गावात 24 एप्रिल रोजी: या मायलेकींचा गळा आवळून खून झाला होता. या सदरचा खून पतीने केल्याच्या संशयातून पती बिराप्पा बेंळूखे यास अटक करण्यात आली होती. उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी याचा सखोल तपास करून सदरचा खूनाच्या मुख्य मारेकरांचा छडा लावला आहे. याप्रकरणी विकास मारुती बेळुंखे आणि अक्षय रामदास बेळुंखे, हे दोघे संशयतांना अटक करण्यात आली आहे. तर बबल्या बेळुंखे हा फरार झाला आहे.