महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 30 लाख रुपये निधी देणार - विक्रमसिंह सावंत

जत तालुक्‍यात ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होईल, त्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून ३० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

vikramsinh sawant
vikramsinh sawant

By

Published : Dec 25, 2020, 8:11 PM IST

जत (सांगली) - जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये, यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तालुक्‍यासाठी एक संकल्पना मांडली आहे. जत तालुक्‍यात ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध होईल, त्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून ३० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

कोरोनामुळे हानी

कोरोनामुळे जत तालुक्‍याची खूप मोठी हानी झाली आहे. अजूनही कोरोनाचा धोका संपला नाही. जनसामान्यांना कोरोनाचा व अतिवृष्टीचा मानसिक आणि आर्थिक फटका बसल्याने त्यांचे जीवन विस्कळित झाले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 23 तारखेपासून ग्रामपंचायतींचे नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामपंचायतीला आर्थिक झळ लागू नये, यासाठी ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्यांना प्रत्येकी 30 लाख रुपयांचे बक्षीस म्हणून देण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना जाहीर केली आहे.

विकासास हातभार लावण्याचे आवाहन

या काळामध्ये आपण ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावातील वाद, गट-तट बाजुला ठेवत ग्रामपंचायत बिनविरोध करावी. गावातील होतकरू, निर्व्यसनी, योजनांची माहिती असणाऱ्या तरुणांनी व सर्व ज्येष्ठांनी आपल्या गावासाठी सहभागी व्हावे. यातूनच गावाचा विकास होण्यासाठी हातभार लागेल, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details