महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या खंजीरमुळे रक्तबंबाळ झालाय तर सत्तेतुन बाहेर पडा - मंत्री रामदास आठवलेंचा काँग्रेसला सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे तुम्ही जर एवढे रक्तबंबाळ झाला असाल,तर राष्ट्रवादी सोबत राहणं योग्य होणार नाही.काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडावे,अशी नाना पटोले यांना माझा सल्ला आहे. एवढा अपमान होत असेल,तर काँग्रेसने आपला स्वाभिमान जिवंत ठेवावा. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार चालवत आहे,त्यामुळे काँग्रेसला सरकारमध्ये काही महत्व नाही,असा टोलाही मंत्री आठवले यांनी लगावला आहे.

minister ramdas athavle on congres and ncp politics in sangli
मंत्री रामदास आठवलेंचा काँग्रेसला सल्ला

By

Published : Jun 1, 2022, 8:25 PM IST

Updated : Jun 1, 2022, 8:46 PM IST

सांगली -राष्ट्रवादीच्या खंजीरमुळे जर खरच काँग्रेस रक्तबंबाळ झाली असेल,तर काँग्रेसने सत्ते मधून बाहेर पडावे,असा सल्ला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले यांना दिला आहे. तसेच राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी,अशी मागणी देखील मंत्री आठवले यांनी केली.

राष्ट्रवादीच्या खंजीरमुळे रक्तबंबाळ झालाय तर सत्तेतुन बाहेर पडा
राष्ट्रवादीच्या खंजीरने रक्तबंबाळ झालंय, मग सत्तेतुन बाहेर पडा -काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात आलेला खंजीर खूपसल्याच्या आरोपावरून बोलताना मंत्री आठवले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे तुम्ही जर एवढे रक्तबंबाळ झाला असाल,तर राष्ट्रवादी सोबत राहणं योग्य होणार नाही.काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडावे,अशी नाना पटोले यांना माझा सल्ला आहे. एवढा अपमान होत असेल,तर काँग्रेसने आपला स्वाभिमान जिवंत ठेवावा. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार चालवत आहे,त्यामुळे काँग्रेसला सरकारमध्ये काही महत्व नाही,असा टोलाही मंत्री आठवले यांनी लगावला आहे.राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागा - उत्तर भारतीय भाजप खासदार आणि अनेक नेते व संघटनांनी दर्शवलेल्या विरोधावरूनबोलताना रामदास आठवले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राम्हणांनी विरोध केला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशातील गागा भट यांनी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश मधील लोकांना विरोध करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना विरोध केल्या प्रमाणे आहे. पण राज ठाकरे यांच्या दौऱ्याला काही संघटनांनी विरोध केला आहे. मात्र, राज ठाकरे यांना अयोध्येला जाण्याचा अधिकार आहे. पण ज्या संघटना राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी करत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी उत्तर भारतीयाल नागरिकांची माफी मागायला हवी,अशी मागणी देखील मंत्री आठवले यांनी केली आहे.
Last Updated : Jun 1, 2022, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details