महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना, हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकत आहे - जयंत पाटील - जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यक्रम जयंत पाटील

राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आहे मात्र शिवसेना, हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकत आहे, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Minister Jayant Patil comment on congress ) यांनी केली. ते सांगलीमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

minister jayant patil comment on congress
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यक्रम जयंत पाटील

By

Published : Feb 7, 2022, 8:21 PM IST

Updated : Feb 7, 2022, 8:27 PM IST

सांगली - राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ आहे मात्र शिवसेना, हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकत आहे, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Minister Jayant Patil comment on congress ) यांनी केली. ते सांगलीमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील

हेही वाचा -Singer Lata Mangeshkar : लता दीदींनी 'या' ठिकाणी गिरवले होते संगीताचे पहिले धडे

काँग्रेस आणि शिवसेनेला लगावला राष्ट्रवादीने टोला

मिरजेचे सहकार तपस्वी दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या स्मरणार्थ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सहकार तपस्वी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयात पार पडला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता आहे. या समारंभास काँग्रेसचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांना यायला उशीर झाला, त्याचा संदर्भ घेऊन बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी शिवसेना आणि काँग्रेसला मिश्कील टोला लगावला आहे.

तुमच्या नादाला लागल्याने वेळ चुकतेय

मंत्री पाटील म्हणाले, आपल्या पक्षाचे चिन्ह घड्याळ आहे, त्यामुळे वेळेचा आणि माझा संबंध फार. असे वाक्य उच्चारून मध्येच थांबत मिश्कीलपणाने धनुष्यबाण आणि हाताच्या नादाला लागल्यापासून आपली वेळ चुकायला लागली आहे, अशी टोलेबाजी करतच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. त्यानंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिघांनी एकत्र आल्यावर काय होऊ शकते, हे दाखवून दिले, असे मतही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा -Rambhau Lad Passed Away : तुफान सेनेचे कॅप्टन रामभाऊ लाड यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन

Last Updated : Feb 7, 2022, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details