महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Corporation Annual Meeting : महापालिकेच्या महासभेत प्रचंड गदारोळ; राष्ट्रवादी विरोधात काँग्रेस, भाजपा एकवटली

सांगली महापालिकेची ( Sangli Municipal Corporation Annual Meeting ) सभा प्रचंड गदारोळात पार पडली. यावेळी महापौरांनी सभेमधून काढता पाय घेतल्याने काँग्रेस आणि भाजपा नगरसेवकांनी ( Mess Create By Congress and BJP Corporators ) महापौरांच्या विरोधात घोषणा देत सभागृहात दणाणून सोडले.

Sangli Corporation Annual Meeting
Sangli Corporation Annual Meeting

By

Published : Apr 18, 2022, 5:06 PM IST

सांगली -प्रचंड गदारोळात सांगली महापालिकेची ( Sangli Municipal Corporation Annual Meeting ) सभा पार पडली आहे. यावेळी भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान महापौरांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. तर महापौरांनी सभेमधून काढता पाय घेतल्याने काँग्रेस आणि भाजपा नगरसेवकांनी ( Mess Create By Congress and BJP Corporators ) महापौरांच्या विरोधात घोषणा देत सभागृहात दणाणून सोडले.

महापालिकेच्या महासभेत प्रचंड गदारोळ

राष्ट्रवादी विरोधात काँग्रेस आणि भाजपाचा हल्लाबोल -सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची महासभा आज पार पडली. मात्र, या सभेत प्रचंड गदारोळ आणि गोंधळ निर्माण झाला होता. पॉईंट ऑफ ऑर्डरच्या विषयावरून सदस्यांना बोलू न दिल्याने भाजपा आणि काँग्रेस नगरसेवकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. या विषयावरून कॉंग्रेस आणि भाजपा सदस्यांनी महापौरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या भाजपा आणि काँग्रेस नगरसेवकांनी पिठासनाकडे धाव घेतल्याने महापौरांना सभेचे कामकाज आवरते घ्यावे लागले.

महापौरांना धक्काबुक्की - काँग्रेस आणि भाजपा सदस्यांनी महापौरांना रोखत राजदंड ताब्यात घेऊन पळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. त्यानंतर संतप्त नगरसेवकांचा सभा सुरू ठेवण्याबाबत महापौरांना सूचना केल्या. मात्र, महापौरांनी अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर करत सभा सोडून जाणे पसंद केले. यामुळे संतप्त झालेल्या भाजपा आणि काँग्रेस नगरसेवकांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या गदारोळ दरम्यान महापौरांनी धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. तर सभागृहातून महापौरांनी काढता पाय घेतल्याने संतप्त झालेल्या भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांनी महापौर पळाले, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडला.

हेही वाचा -Suspicion Of Offensive Photo : नर्सचा मोबाईल फोडण्यासाठी डाॅक्टरानेच दिली सुपारी

ABOUT THE AUTHOR

...view details