सांगली -विविध प्रलंबित मागण्यांसाठी हमाल, माथाडी कामगारांनी आंदोलन केले. सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी हमाल माथाडी कामगारांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
सांगलीत विविध प्रलंबित मागण्यांसाठी हमाल, माथाडी कामगारांचे धरणे आंदोलन
महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाच्या आदेशानुसार आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांनी सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाच्या आदेशानुसार आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांनी सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन केले. राज्यात माथाडी हमाल कामगार कायद्याच्या अंमलबजावणीतील अनागोंदी व मनमानी कारभार तत्काळ थांबवावा, कायद्याची त्वरीत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, राज्यातील माथाडी मंडळाचे गुंडाळपट्टी बंद करून मंडळ कार्यक्षम होतील याची दक्षता घ्यावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी हमाल माथाडी कामगार मोठया संख्येने सहभागी झाले होते.