सांगली - येथे एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. संजोती विजयकुमार पाटील, असे या महिलेचे नाव आहे. या महिलेने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लावून आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
सांगलीत विवाहितेची गळफास लावून आत्महत्या - गळफास
सांगलीत एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संजोती विजयकुमार पाटील असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
संजोती पाटील, या सांगलीच्या पुष्पराज चौक येथील राजमाता हाउसिंग सोसायटीमध्ये राहतात. तर सोमवारी त्यांनी आपल्या राहत्या घरातील टेरेसवर लाकडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पंचनामा केला. घरी कोणी नसताना संजोती पाटील यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. परंतु, ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत.