महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र बंद म्हणजे आघाडी सरकारचा "कांगावा" - गोपीचंद पडळकर

लखीमपूरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. "महाराष्ट्र मधील बंद म्हणजे आघाडी सरकारचा कांगावा" अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Gopichand padalkar
Gopichand padalkar

By

Published : Oct 11, 2021, 3:52 PM IST

सांगली -"महाराष्ट्र मधील बंद म्हणजे आघाडी सरकारचा कांगावा" असून आपल्या घरात आग लागलेली असताना, शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखा हा प्रकार आहे,अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच तुम्हाला काकाचे दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची कीड साफ करत आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे कारखाने कवडी मोल भावाने गिळणाऱ्यावरती फास आवळत आहेत. म्हणूनच याचं पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा केला आहे,अशी टीकाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीच्या झरे येथे बोलत होते.

महाराष्ट्र बंद म्हणजे आघाडी सरकारचा "कांगावा"
लखीमपूरबद्दल आम्हालाही सहवेदना
आमदार पडळकर म्हणाले, लखीमपूरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी क्षमतापूर्ण आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल बोला
जनाब राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. तो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाही. अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेलं आहे.

हेही वाचा -औरंगाबादमध्ये बुडून तिघांचा मृत्यू, रविवारची सुटी बेतली जिवावर

ABOUT THE AUTHOR

...view details