महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धनगर समाजाला मीच मिळवून देणार आरक्षण - दुग्धविकास मंत्री महादेव जानकर - mahadev-jankar

धनगर समाजाच्या शेळी-मेंढ्या विकास महामंडळाला सरकारकडून १ हजार कोटी देण्यात येणार असून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे यावेळी जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

धनगर समाजाला मीच मिळवून देणार आरक्षण - महादेव जानकर

By

Published : Apr 19, 2019, 3:09 PM IST

सांगली - धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार आहे. त्याची सुरवात आम्ही केली आहे. त्यामुळे शेवटही आम्हीच करणार, असा विश्वास दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. ओबीसी कमिशनला याआधी घटनात्मक दर्जा नव्हता. मात्र नरेंद्र मोदी यांनी तो दिला, असे मतही मंत्री जानकर यांनी व्यक्त केले आहे. आज सांगली आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

धनगर समाजाला मीच मिळवून देणार आरक्षण - जानकर

सांगली लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ दुग्धविकास मंत्री महादेव जानकर सांगली दौऱ्यावर आले होते. त्यावेळी जानकार यांनी पत्रकार परिषद घेऊन धनगर आरक्षण बाबतीत भजाप आणि आपली भूमिका स्पष्ट केली. धनगर समाजाला आरक्षण हे मिळणार आहे आणि हे आरक्षण मीच मिळवून देणार आहे असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र पातळीवर आहे. राज्य सरकारकडूनही याबाबतचे प्रयत्न सुरू आहेत. शिफारस करण्याबरोबरच टिकणारे आरक्षण देण्यासाठी आपण आग्रही आहोत. धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सामाजिक आरक्षण देण्यात आले आहे. फक्त राजकीय आरक्षण देणे बाकी आहे. त्यामुळे धनगर आरक्षण देण्याची सुरवात आम्ही केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेवटही आपण करणार, असा विश्वासही मंत्री जानकार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, देशातील ओबीसी कमिशनला या आधी कोणताही घटनात्मक दर्जा नव्हता. मात्र, एनडीएच्या बैठकीत आम्ही मागणी केली आणि नरेंद्र मोदी यांनी ओबीसी कमिशनला घटनात्मक दर्जा दिला, असे मतही यावेळी मंत्री जानकर यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर धनगर समाजाच्या शेळी-मेंढ्या विकास महामंडळाला सरकारकडून १ हजार कोटी देण्यात येणार असून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे यावेळी जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details