महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत साडेबारा हजारांची चिल्लर घेऊन आला लोकसभेचा उमेदवार, अधिकारी हैराण - candidate

सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी एका उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी लागणारी अनामत रक्कम ही चक्क 'चिल्लर'च्या स्वरुपात 'अदा' केली.

अभिजित बिचुकले सांगली अपक्ष उमेदवार

By

Published : Apr 2, 2019, 9:39 AM IST

Updated : Apr 3, 2019, 12:53 PM IST

सांगली- लोकसभेची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी एका उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी लागणारी अनामत रक्कम ही चक्क 'चिल्लर'च्या स्वरुपात 'अदा' केली. अभिजित बिचुकले असे या उमेदवाराचे नाव असून त्यांनी साडेबारा हजार रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडे अनामत रक्कम म्हणून जमा केली. बिचकुळे यांनी दिलेली चिल्लर रक्कम मोजताना निवडणूक प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक झाली.

अभिजित बिचुकले सांगली अपक्ष उमेदवार


सांगली लोकसभा निवडणुकीसाठी अभिजित बिचुकले यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आहे. त्यांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची स्टाईल थोडीशी हटके ठरली. कारण निवडणूक अर्ज भरताना अनामत रक्कम भरण्यासाठी लागणारे पैसे त्यांनी चिल्लर स्वरूपात आणले होते. पिशव्या भरून चिल्लर घेऊन बिचकुले यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. तब्बल २५ हजार रुपयांची चिल्लर घेऊन ते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बिचुकले पोहोचले होते. त्यांच्या जातीच्या दाखल्यामुळे त्यांना साडेबारा हजार रुपये भरावे लागतील, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा बिचकुले यांनी दोन रुपये, पाच रुपये आणि दहा रुपये असे नाणे स्वरूपातील चिल्लर रक्कम अधिकाऱयांना दिली. ती रक्कम त्यांनी मोजून घेण्यास सांगितले. तेव्हा मात्र, ही चिल्लर भरून घेताना प्रशासनाची चांगलीच दमछाक उडाली.


नाणी जमा करण्याचा आपल्याला छंद असल्यामुळे ही रक्कम जमा झाली होती. ती आज या निवडणुकीचा अर्ज भरताना वापरली. असे बिचकुले यांनी सांगितले. मूळचे सातारचे असलेले बिचुकले हे सांगलीचे जावई असून देवराष्ट्र हे त्यांच्या पत्नीचा गाव आहे. त्यामुळे मी जावई म्हणून सांगलीच्या लोकसभा मैदानात उतरलो आहे. २००९ मध्ये सातारचे खासदार उदयनराजे यांच्याविरोधात निवडणुकीसाठी आपल्या पत्नीला आपण मैदानात उतरवलो होते. ती सांगलीची कन्या म्हणून ही अभिमानाची गोष्ट होती. आता सांगली लोकसभेसाठी आपण स्वतः निवडणूक लढवत आहे. सांगलीच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढत असल्याचे बिचुकले यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Apr 3, 2019, 12:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details