महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 4, 2020, 10:37 PM IST

ETV Bharat / state

आईचा खून करणाऱ्या निर्दयी मुलाला जन्मठेपेची शिक्षा

किरण बंडगे असे या आरोपी मुलाचे नाव असून सांगली जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. जत तालुक्यातील बाजमध्ये किरण याने आपल्या आईचा निर्घृण खून केला होता.

sangli
आईचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा

सांगली- आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. किरण बंडगे असे या आरोपी मुलाचे नाव असून सांगली जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. जत तालुक्यातील बाजमध्ये किरण याने आपल्या आईचा निर्घृण खून केला होता.

सांगलीच्या जत तालुक्यातील बाज याठिकाणी जानेवारी 2016 मध्ये किरण बंडगे याने आपली सख्खी आई नंदाबाई बंडगे यांचा निर्घृन खून केला होता. घटनेच्या दिवशी किरण याने आईच्या परकरने हात पाय पुसले होते. यावरून किरणच्या आईने किरणला, एवढा मोठा झालास, तुला कळत नाही का, टॉवेलने हात पाय पुसायचे सोडून परकरने पुसतोस? असे खडसावले. याचा राग मनात धरून रागीट स्वभावाच्या किरणने घरातील विळ्याने झोपलेल्या आईवर वार करत तिला ठार मारले. तसेच घरात असणाऱ्या आजी वैजयंती बंडगे आणि वडील रायप्पा बंडगे यांच्यावरसुद्धा हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावेळी शेजारचे लोक जमा झाल्याने आजी वैजयंती बंडगे आणि वडील रायप्पा बंडगे हे वाचले होते.

याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात किरण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी या खून खटल्याची सुनावणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. यामध्ये सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष, पुरावे याआधारे किरण याला दोषी ठरवत आईचा खून करून वडील व आजी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी किरण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी पाहिले.

ABOUT THE AUTHOR

...view details