महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत तळीराम दारूसाठी आले अन् पोलिसांचा प्रसाद खाऊन गेले - सांगली बातमी

तब्बल पन्नास दिवसांनंतर मद्यविक्री सुरु झाल्याने खरेदी करण्यासाठी मद्यप्रेमींनी दुकानांसमोर गर्दी केली होती. दारू खरेदीसाठी आलेल्या तळीरामांना दारूऐवजी पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद खावा लागला.

तळीरामांना पांगवताना पोलीस
तळीरामांना पांगवताना पोलीस

By

Published : May 5, 2020, 5:26 PM IST

सांगली - शहरातील एका दारू दुकानासमोर तळीरामांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत गर्दी पांगवली आहे. त्यामुळे दारू खरेदीसाठी आलेल्या तळीरामांना दारूऐवजी पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद खावा लागला. तर गर्दी झाल्यामुळे दारू दुकान बंद करण्यात आले.

तळीरामांना पांगवताना पोलीस

सांगली ऑरेंज झोनमध्ये गेल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने सांगली जिल्ह्यात दारू दुकानांना विक्रीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. बाजारपेठ वगळता इतर ठिकाणच्या मद्यविक्री दुकानांना दारू विकण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे सोमवारी (दि. 4 मे) मद्यदुकाने सुरू होऊ शकले नाहीत. त्यामुळे दारू खरेदीसाठी आतुर झालेल्या तळीरामांचा हिरमोड झाला होता.

मात्र, आज सकाळपासून दारूची दुकाने सुरू झालेली आहेत. दहा वाजता दारू विक्री सुरू झाल्यानंतर या दारू दुकानांसमोर तळीरामांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. सांगलीच्या एस. टी. स्टॅंड नजीकच्या एका दारू दुकानासमोर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा तळीरामांना फज्जा उडवला. वारंवार या ठिकाणी पोलिसांच्याकडून रांगेत उभे राहिलेल्या तळीरामांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात येत होते. मात्र, दारू खरेदी करण्यासाठी आतुर झालेल्या तळीरामांच्याकडून सामाजिक अंतराचा फज्जा उडवत एकमेकांना ढकला-ढकली करण्यात येत होती.

त्यामुळे अखेर पोलिसांनी सामाजिक अंतराचे नियम मोडणार्‍या तळीरामांवर लाठीमार करत याठिकाणी झालेली गर्दी पांगवली. दारू खरेदी करण्यासाठी आलेल्या तळीरामांना दारूऐवजी पोलिसांच्या काठयांचा प्रसाद मिळाला. तर या घटनेनंतर सांगली शहरातील हे दारू दुकान बंद ठेवण्यात आले.

हेही वाचा -सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रिनिंग सर्व प्रक्रिया पार पाडून सांगलीत दारू विक्री; तब्बल दोन किलोमीटरपर्यंत तळीरामांच्या रांगा

ABOUT THE AUTHOR

...view details