कोल्हापूर/ सांगली - गेल्या ८ दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यांमध्ये महापुराचा हाहाकार माजला आहे. त्यामुळे लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे, तर पुणे विभागात एकूण २९ जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आता कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी ओसरले आहे, तर सांगलीतील महापूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर सांगली पूरस्थिती नियंत्रणात येणार आहे.
कोल्हापूर सांगली पूरस्थिती LIVE : पंचगंगेचे पाणीपातळीत घट; सांगलीतील ब्रह्मनाळ दुर्घटनेत पुन्हा सापडले ३ मृतदेह
गेल्या ८ दिवसापासून कोल्हापूर, सांगलीत पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर सांगली पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोल्हापूर सांगली पूरस्थिती
LIVE UPDATE :
- ३.०० वा. - ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेतील ३ मृतदेह सापडले. यामध्ये दोन महिला आणि एका अडीच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. सुरेखा नरुटे आणि रेखा वावरे अशी या महिलांची नावे असून लहान मुलीचे नाव समजलेले नाही.
- १.०७ वा. - पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सांगलीत दाखल
- १२.०९ वा. - शरद पवारांच्या आवाहनानंतर बारामतीतून पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयांची मदत.
- ११.५६ वा - साईसंस्थानकडून कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांसाठी १० कोटी रुपयांची मदत.
- ११.५१ वा. - सांगलीच्या महापुरात ४ दिवसांपासून अडकलेल्या एका वृद्धाचा आज मृत्यू झाला. लिंगापा हाण्डगी (वय ७४ )असे या वृद्धाचे नाव आहे.
- ११.३५ वा. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने घट. पाणीपातळी ५२.१ फुटांच्या खाली.
- ९.२५ वा. - महापुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
- ९.२० वा. - सांगलीतील महापूर ओसरण्यास सुरुवात. पाणीपातळी ५७ फुटांच्या खाली.
- ६.०० वा. - कोल्हापुरातील शिरोली गावात बचावकार्य सुरू
Last Updated : Aug 10, 2019, 3:23 PM IST