सांगली - अपघातप्रकरणी नुकसान भरपाईचे आदेश देऊनही भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्नाटक एसटी मंडळाला सांगली न्यायालयाने ( Sangli Court ) दणका दिला. थेट बस जप्त करून मृत कुटुंबाच्या ताब्यात दिली ( Karnataka ST Bus Seized For Compensation ) होती. मिरज शहरात 2015 साली कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसच्या धडकेत भानुदास भोसले यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भोसले कुटुंबाकडून नुकसान भरपाईसाठी सांगली न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कर्नाटक एसटी मंडळाला मृत भोसले यांच्या कुटुंबियांना 8 लाख 33 हजार 563 रुपये देण्याचे आदेश 2020 साली दिले होते. मात्र, कर्नाटक महामंडळाकडून नुकसानभरपाई रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे बस जप्त करुन भोसले कुटुंबियांना देण्यात आली होती. त्यानंतर कर्नाटक परिवहन महामंडळाने नुकसानीची रक्कम भरुन बस परत नेली.
नंतर मृत भोसले यांच्या पत्नी विजया यांनी सांगली न्यायालयामध्ये ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सांगली न्यायालयाने अपघातातील एसटी बस किंवा कर्नाटक महामंडळाची कोणतीही एसटी बस जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कर्नाटक महामंडळाची बेलहोंगल आगाराची बस जप्त करत भोसले यांच्या कुटुंबियांना दिली. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याची खात्री मृत भानुदास भोसले यांचे चिरंजीव अभय भोसले यांनी व्यक्त केली.