महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

''कडकनाथ' प्रकरणी सदाभाऊ खोतांचा राजीनामा घ्यावा'

कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सदाभाऊ खोत यांनी धमकी सत्र सुरू केल्याचा आरोप सांगली जिल्हा सुधार समिती व विविध संघटनांनी केला आहे. तसेच मंत्री असणारे खोत हे असंसदीय भाषा वापरून धमकी देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेमध्ये धमकीची आणि गलिच्छ भाषा वापरणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे.

सांगली जिल्हा सुधार समितीचे सदस्य

By

Published : Sep 1, 2019, 6:51 PM IST

सांगली - कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यावरून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेवर जिल्हा सुधार समितीने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. खोत यांनी केलेली टीका बेताल आणि खालच्या पातळीची असल्याने मुख्यमंत्र्यांनी 24 तासात त्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा समितीने दिला आहे.

सांगली जिल्हा सुधार समितीचे अमित शिंदे पत्रकारांशी बोलताना

हेही वाचा - ही तर ठगांची टोळी; सदाभाऊ खोतांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सदाभाऊ खोत यांनी धमकी सत्र सुरू केल्याचा आरोप सांगली जिल्हा सुधार समिती व विविध संघटनांनी केला आहे. तसेच मंत्री असणारे खोत हे असंसदीय भाषा वापरून धमकी देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पत्रकार परिषदेमध्ये धमकीची आणि गलिच्छ भाषा वापरणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे.

हेही वाचा - पूरस्थितीचा सामना करायला प्रशासनाला उशीर - सदाभाऊ खोत

महाराष्ट्राच्या एका मंत्र्यांने अशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन असंसदीय भाषा वापरल्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तसेच कडकनाथ घोटाळ्याची स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचे होत असणाऱ्या नुकसानीसाठी त्यांनी मदत जाहीर करावी, अशी मागणीही येथे सुधार समिती व विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details