महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृष्णेची पाणी पातळी पोहचणार 35 फुटांवर - जयंत पाटील - जयंत पाटील कृष्णा पाणी पातळी

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी ही संततधार पाऊस आणि कोयना धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे वाढत आहे. तर पाण्याची पातळी रविवारी सायंकाळपर्यंत 35 फुटांवर पोहोचेल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : Aug 16, 2020, 3:53 PM IST

सांगली - 'कृष्णा नदीच्या पाणी पातळी सायंकाळपर्यंत 35 फुटां पर्यंत पोहचेल.' अशी माहिती जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. यासोबतच म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पावसाचे पाणी दुष्काळी भागाला देण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मिरजेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मागील तीन ते चार दिवसांपासून सांगली सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी असणारे धरणे भरत आहेत. या पार्श्वभूमीवर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी ही संततधार पाऊस आणि कोयना धरणातून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे वाढत आहे. तर पाण्याची पातळी रविवारी सायंकाळपर्यंत 35 फुटांवर पोहोचेल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

मंत्री जयंत पाटलांची प्रतिक्रिया

हेही वाचा -मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 'बायपास रोड'वरून, वाशिष्ठी पुलावर अद्यापही पाणी

रविवारी दुपारपर्यंत कृष्णा नदीची पाणी पातळी 26 फुटांवर पोहोचली होती. मात्र, कृष्णा क्षेत्रात आणि कोयना धरणात पावसाची संततधार कायम आहे. परिसरातही पावसाचा जोर आहे. त्यामुळे कोयना धरण भरले असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळेच कृष्णा नदीची पाणी पातळी वाढणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तर दुसर्‍या बाजूला हे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातल्या ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजना येत्या दोन दिवसात सुरु करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागातील तलाव भरण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यापर्यंत हे पाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणचेही तलाव भरण्यात येतील, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण प्रशासनासोबत आम्ही संपर्क ठेवून आहोत आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील धरणातील पाण्याचेही नियोजन करण्यात येत असल्याचे, मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -..तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

ABOUT THE AUTHOR

...view details