महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राम मंदिरात जयंत पाटलांच्या हस्ते कलश पूजन, अयोध्येला जाणार असल्याची दिली माहिती - संजय शिरसाट

Jayant Patil News : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम मंदिराचं लोकार्पण होणार आहे, त्यानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कलश पूजनाचं आयोजन करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरात कलश पूजन केलं.

kalash poojan by jayant patil at ram mandir in islampur
इस्लामपूर येथील राम मंदिरात जयंत पाटलांच्या हस्ते कलश पूजन

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 1:50 PM IST

इस्लामपूर येथील राम मंदिरात जयंत पाटलांच्या हस्ते कलश पूजन

सांगली Jayant Patil News : आज (1 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरात कलश पूजन केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील :यावेळी बोलत असताना जयंत पाटील म्हणाले की, 1984 साली माझे वडील राजाराम बापू पाटील यांनी त्यांच्या शेवटच्या काळात या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून दरवर्षी इथं रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 'राम' हे सर्वांचे आहेत. अयोध्येत राम मंदिर होतंय याचा सर्वांनाच आनंद आहे. निमंत्रण पत्रिका देताना काही त्रुटी राहू शकतात. मात्र, राम मंदिर उभा राहतंय हेच आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. तसंच आपण अयोध्येला जाणार असल्याचंही यावेळी जयंत पाटलांनी यावेळी सांगितलं.

अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर टीका करणारे आपआपल्या कामाला लागतील. त्यामुळं त्यांना या सगळ्याचा काही राजकीय फायदा होईल, असं वाटत नाही. तसंच मलाही राम मंदिर बघण्याची इच्छा आहे. गर्दी कमी झाल्यावर मी अयोध्याला नक्की जाणार आहे-राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

संजय शिरसाट यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया : रविवारी (31 डिसेंबर) जयंत पाटलांमुळं महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला होता. त्यानंतर यावरुन राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोपांच्या मालिका रंगायला सुरुवात झाल्याचं बघायला मिळालं. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत जयंत पाटील म्हणाले की, काही लोक मनानं आणि शरीरानं तिकडे असल्याचं भासवतात. पण ते मनाने इकडेच आहेत. तसंच शिरसाट यांना आणखी खोलात जाऊन विचारा, म्हणजे मला जी माहिती नाही ती कळेल, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.

हेही वाचा -

  1. जयंत पाटलांमुळं महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, आमदार संजय शिरसाट यांचा दावा
  2. राज्यात 78 हजार कुपोषित बालके, तीन महिन्यात राज्यात २४०० बालकांचा मृत्यू, जयंत पाटील यांचा विधानसभेत स्थगन प्रस्ताव
  3. Jayant Patil On Ramesh Kadam : शरद पवार ब्लॅकमेल प्रकरण; रमेश कदम कशाच्या आधारे आरोप करतात माहिती नाही, जयंत पाटलांनी केलं स्पष्ट

ABOUT THE AUTHOR

...view details