सांगली - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनावधानाने आणि अनुकंपा तत्वावर राजकारणात आले आहेत, अशी खोचक टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शरद पवारांनी जयंत पाटलांना युनोमध्ये पाठवता येते का बघावं,असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानावरून आमदार पडळकर यांनी संगलीत ही टीका केली आहे.
जयंत पाटील हे अनुकंपा तत्वावर आलेले राजकारणी, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका गुणवत्ता नसताना जयंत पाटील राजकारणात-पडळकरराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत भावना व्यक्त केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. जयंत पाटील यांच्या या विधानावरून गोपीचंद पडळकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ज्याप्रमाणे काही शासकीय नोकऱ्यांमध्ये अनुकंपा भरतीचे धोरण राबविले जाते. यासाठी गुणवत्तेऐवजी केवळ पात्रता हा निकष असतो, त्याप्रमाणेच जयंत पाटील हे राजाराम बापूंच्या जागेवर अनुकंपा तत्वावर राजकारणात आले आहे अशी खोचक टीका पडळकर यांनी केली आहे.
जयंत पाटलांना युनो मध्ये पाठवाजयंत पाटील यांनी जिल्ह्यात काही केले नाही, तसेच राज्यात राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्री पद निर्माण होईल का नाही अशी स्थिती नाही. तसेच भविष्यात राष्ट्रवादी पक्ष राहील का नाही,याबाबत मला शंका आहे. त्यामुळे जयंत पाटील राष्ट्रवादीतून मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही. जयंत पाटलांनी व्यक्त केलेल्या भावनेची शरद पवार यांनी गंभीर दखल घ्यावी, आणि जयंत पाटील यांना युनोमध्ये वगेरे पाठवता येते का हे पवार साहेबांनी बघावे, कारण जयंत पाटील हे फार बुद्धिमान आहेत अशी त्यांच्या पक्षाची भूमिका आहे असा टोलाही पडळकर यांनी लगावला आहे.