सांगली - जिल्ह्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन 11 सप्टेंबरपासून दहा दिवसांसाठी जिल्ह्यामध्ये 'जनता कर्फ्यू' जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी याबाबत जनतेला जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन केले आहे.
सांगली जिल्ह्यात 11 सप्टेंबरपासून 10 दिवसांसाठी 'जनता कर्फ्यू'
11 सप्टेंबरपासून जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यू जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी जाहीर केला आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवारपासून 10 दिवस जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विशेषता महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा लॉकडाऊन करण्याची मागणी अनेक पातळ्यांवर सुरू होती, मात्र सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. 11 सप्टेंबरपासून जिल्ह्यामध्ये जनता कर्फ्यू जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी जाहीर केला आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवारपासून 10 दिवस जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच स्वत: बरोबरच कुटुंबीयांना कोरोना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोर पालन करावे, गर्दी करू नये, असे आवाहनही केले आहे. तसेच रॅपिड अँटीजेन टेस्ट व आरटीपीसीआर तपासणीची संख्या वाढवण्यात येत आहे. त्यामुळे जरी रुग्ण संख्या वाढली तरी कोणीही घाबरून जावू नये. तसेच कोरोनावर सहजासहजी मात करता येऊ शकते. यासाठी काही लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. कोणीही दुखणे अंगावर काढू नये. लक्षणे नसल्यास किंवा सौम्य लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशन किंवा कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराखाली रहावे. प्रकृती स्थिर असल्यास होम आयसोलेशमध्येही रुग्ण बरा होऊ शकतो, असे मतही जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केले आहे.