महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी देणार - जलसंपदा मंत्री - Water Resources Minister Jayant Patil

सांगलीमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सिंचन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना पाटील यांनी, यावर्षी राज्यातील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे.

jayant patil
सांगलीमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सिंचन आढावा बैठक

By

Published : Feb 8, 2020, 6:47 AM IST

सांगली - राज्यातील अपुऱ्या सिंचन योजनांचे काम सध्या सुरू आहेत. तसेच यावर्षी सिंचन योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सिंचन योजना लवकर पूर्ण होतील, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच सांगली जिल्ह्यातील पाण्यापासून वंचित गावांना न्याय देण्याची भूमिकाही घेण्यात आल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. सांगलीमध्ये आयोजित सिंचन आढावा बैठकी प्रसंगी जयंत पाटील बोलत होते.

सांगलीमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उस्थितीत सिंचन आढावा बैठक...

हेही वाचा... महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पूर्वी पूर्ण करा - मुख्यमंत्री

सांगली जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन योजना आणि सिंचन योजनांपासून वंचित असणाऱ्या गावांच्या प्रश्नांबाबत, शुक्रवारी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत आढावा बैठक संपन्न झाली. सांगलीच्या वारणाली येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासह जिल्ह्यातील दुष्काळी भागातील अनेक शेतकरी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी हजर होते.

हेही वाचा... 'मागच्या सरकारनं सुडबुद्धीनं नाशिकची विकासकामे अडवली'

यावेळी दुष्काळी भागातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण कराव्यात. तसेच सिंचन योजनेतून अनेक गावांना वंचित राहावे लागले आहेत, याबाबत आग्रही भूमिका मांडली. यावर मंत्री जयंत पाटील यांनी, जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी तसेच पाण्यापासून वंचित गावांना न्याय देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. राज्यातील अपुऱ्या सिंचन योजनाही पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी यावर्षी आणखीन निधीही देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अपुऱ्या सिंचन योजना लवकर पूर्ण होतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details