सांगली: वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथील प्रियांका सुनील गुरव या, महिलेचा गळा आवळून आणि मान तोडून अमानुष खून करुन तीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह टाकल्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपूरच्या वाघवाडी येथे समोर आला आहे.अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी एका संशयित तरुणास इस्लामपुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाघवाडी येथील शिवपुरी रोडवरील बांदल मळ्यात हा खून केल्याचे समोर आले आहे. शेतातील एका लिंबाच्या झाडाखाली प्रियांका यांचा मृतदेह सापडला,
Married Woman Murder : विवाहितेचा अमानुष खून करुन विवस्त्र मृतदेह टाकला - Naked corpses thrown
विवाहित महिलेचा अमानुष पध्दतिने खून (Inhuman murder of a married woman) करुन तीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह टाकल्याचा ( Naked corpses thrown ) प्रकार इस्लामपुरच्या वाघवाडी येथे समोर आला आहे. घटनास्थळी सिगारेटचे पाकीट, दारूची बाटली, शेंगदाण्याच्या पुड्या आणि आंबे पडलेले होते. अनैतीक संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी एका संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
इस्लामपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा अमानुषपणे हा खून करण्यात आल्याचे दिसुन आले. प्रियांका यांचे तोंड मातीमध्ये दाबून गळा ओढणीने आवळून हा खून केल्याचे समोर आले तसेच, तीच्या मानेचे हाड मोडलेले होते. तर मृतदेहा जवळ दोन पिशव्या पडलेल्या होत्या त्यात प्रियांका यांचे कपडे आणि मेकअपचे साहित्य आहे. तसेच घटनास्थळी सिगारेटचे पाकीट,दारूची बाटली,शेंगदाण्याच्या पुड्या आणि काही आंबे देखील पडलेले होते. तर ही घटना मंगळवारी रात्री घडली असावी, तसेच हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. खून प्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी एका संशयित तरुणास ताब्यात घेतले आहे.