महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराकडून बचावकार्य, प्रशासनावर मात्र नागरिकांचा रोष

सांगलीमध्ये जवळपास १ लाखाहून अधिक लोकांचा आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे.

पुरात अडकलेली महिला

By

Published : Aug 9, 2019, 1:48 PM IST

सांगली -जिल्ह्यात लष्कराकडून बचाव कार्य अत्यंत भयानक आहे. जवळपास १ लाखाहून अधिक लोकांचा आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. अद्यापही हजारो नागरिक पुरात अडकून पडले आहेत. नागरिकांच्या घरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे, तर गावच्या गावे पुराच्या विळख्यात आहे, अशा या परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रशासनावर रोष व्यक्त करताना पुरग्रस्त नागरिक

नागरिकांना मदत करण्यामध्ये प्रशासन संपूर्णता अपयशी ठरले आहे. या ठिकाणी लष्कर मोठ्या प्रमाणात दाखल झालेले असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले आहे. नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याच्या कामाला आता वेग आला आहे. मात्र, प्रशासनाची कोणतीच मदत मिळत नसल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. सांगलीवाडी गावाला गेली ३ दिवस पुराने घेरले असून देखील प्रशासनाने आमची दखल घेतली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तसेच त्यांनी प्रशासनाचा,आमदार, खासदार यांचा निषेध केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details