महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"सांगली विकणे आहे"... भूखंड भ्रष्टाचारावरून 'नागरिक जागृती मंच'ने प्रसिद्ध केली जाहिरात - सांगली मनपा

आरक्षण उठवून मनपाच्या मालकीचे कोट्यवधी रुपयांचे भूखंड हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिक जागृती मंच संघटनेकडून करण्यात आला आहे. तसेच या भ्रष्टाचारावरून संघटनेने थेट "सांगली विकणे आहे; संपर्क सर्वपक्षीय दलाल", अशा आशयाची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

illegal land transfer in sangli
"सांगली विकणे आहे"... भूखंड भ्रष्टाचारावरून 'नागरिक जागृती मंच'ने प्रसिद्ध केली जाहिरात

By

Published : Dec 11, 2020, 8:01 PM IST

सांगली - आरक्षण उठवून मनपाच्या मालकीचे कोट्यवधी रुपयांचे भूखंड हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिक जागृती मंच संघटनेकडून करण्यात आला आहे. तसेच या भ्रष्टाचारावरून संघटनेने थेट "सांगली विकणे आहे; संपर्क सर्वपक्षीय दलाल", अशा आशयाची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

"सांगली विकणे आहे"... भूखंड भ्रष्टाचारावरून 'नागरिक जागृती मंच'ने प्रसिद्ध केली जाहिरात
आरक्षण हटवून जागा विक्रीचा उद्योग
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या हद्दीत प्रशासनाच्या मालकीचे जवळपास सहाशे भूखंड आहेत. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण देखील आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या या भूखंडांवर आरक्षण उठवून डल्ला मारण्याचा प्रकार महापालिकेच्या आजी-माजी नगरसेवकांकडून घडला आहे. अनेकदा ही प्रकरणे चव्हाट्यावर आल्यानंतर तात्पुरता या भूखंडांचे श्रीखंड खाण्याचा उद्योग थांबला. मात्र आता पुन्हा काही दिवसांपासून पालिकेचे आरक्षण असणाऱ्या जागांवरील आरक्षण उठवून त्या जागा विक्री करण्याच्या डाव सुरू असल्याचा आरोप नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केला आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांचे संगनमत
सांगली महापालिकेची स्थापना होऊन आज 22 वर्षे उलटली आहेत. महापालिका क्षेत्रात किमान 680 भूखंड आहेत. त्यातील जेमतेम 100 भर भूखंडांवर पालिकेची नावे आहेत. बाकीच्या जागांवर पालिकेने आपली नावे लावण्याची तसदी घेतली नाही. पालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत सर्व पक्षाने ज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी ,भाजपा यांनी सत्ता भोगली आणि सर्वांनी मिळलेल्या संधीनुसार भूखंड विक्रीचा उद्योग केला आहे. काँग्रेस सत्तेत असताना तत्कालीन महापौर किशोर जामदार यांच्या कारकिर्दीत हा सर्व प्रकार सुरू झाला. त्यानंतर सांगलीतील सामजिक संघटनांनी आंदोलने केल्यानंतर तूर्त हा भ्रष्टाचाराचा डाव थांबला, असे साखळकर म्हणाले.
अन्यथा पुन्हा जन आंदोलन
पण राज्यातील सत्ता बदलानंतर महापालिका क्षेत्रातील भूखंडांचे आरक्षण उठवून ते विक्री करण्याचा उद्योग पुन्हा सुरू झाला आहे. जरी आज महापालिकेत भाजपाची सत्ता असली तरी विरोधीआणि सत्ताधारी मिळून आरक्षण हटवून भूखंड विक्रीची उदयोग करत आहेत. भविष्यातील प्ले-ग्राउंड, शाळा, उद्यान यांचे आरक्षण उठवून शहराचा खेळ खंडोबा करण्यात येत असल्याचा आरोप सतीश साखळकर यांनी केला आहे. या भूखंड विक्री प्रकरणी टीकात्मक जाहिरात बनवून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पालिकेचे भूखंड विकण्याचा उद्योग न थांबल्यास याविरोधात पुन्हा जन आंदोलन उभारण्याचा इशारा साखळकर यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details