सांगली- जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी अनेक गावातील बंधारे ओढ्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जात आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस नदीला मोठ्या प्रमाणात पाणी
गेले दोन ते तीन दिवस प्रचंड उष्णता वाढली होती. मात्र, दुपारी चार वाजता अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणा गारवा निर्माण झाला असला तरी सळ्यांची तारांबळ उडाली. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव, (ता वाळवा) व शिराळा उत्तर भागातील गिरजवडे, पणुंब्रे, घागरेवाडी, शिवरवाडी, भैरवाडी, टाकवे, पाचुंब्री, बांबवडे परिसरामध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी परिसरातील राणा -माळातून पाणी वाहत होते. या मुसळधार पावसामुळे भोगवती नदी तुडुंब वाहत होती. नदीचा एवढ्या मोठा प्रवाह गावकऱ्यांनी पहिल्यांदाच पाहिला होता.
शेतीचे मोठे नुकसान
सध्या जिल्ह्यामध्ये पेरणीची कामे सुरु आहेत. मान्सून पूर्व मशागती कामे पूर्ण करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज होता. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेताध्ये पाणी साठवून ठेवण्याचे बांध तुटल्यामुळे पावसाचे पाणी शेतात जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.