सांगली- शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे. सांंगली-इस्लामपूर रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे वाहनांवर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले असून या घटनेमुळे सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सांगली शहरासह परिसरामध्ये दुपारनंतर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सुमारे एक तास पडलेल्या पावसामुळे सांगली-इस्लामपूर मार्गावर रस्त्याच्या कडेची झाडे वाहनांवर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सांगलीवाडी नजीकच्या लक्ष्मी फाटा याठिकाणी दोन चालत्या वाहनांवर झाडे कोसळली आहेत. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, किरकोळ स्वरुपात जखमी झाले आहेत. मात्र, झाडे कोसळल्याने वाहनांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या मार्गावर अनेक ठिकाणीही रस्त्यावर झाडे कोसळली होती. त्यामुळे सांगली-इस्लामपूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सांगलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, चालत्या वाहनांवर कोसळली झाडे - सांगली शहर बातमी
सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घटल्या. यामुळे सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती.
नुकसानग्रस्त वाहन