सांगली- जिल्ह्यात धुंवाधार परतीचा पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप आले होते. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. सुमारे तासभर अचानक पडलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
सांगलीत पावसाचा धुमाकूळ, मुसळधार पावसाने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप हे ही वाचा -जिल्ह्यात दमदार पाऊस; अनेक चारा छावण्या बंद, छावणीची बिले काढण्याची मागणी
सांगली शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. सांगली, मिरज, वाळवा, तासगाव तालुक्यातल्या अनेक भागात हा पाऊस पडला. सर्व ठिकाणी पडलेल्या या पावसामुळे अनेक भागातल्या रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे घरांचे पत्रे उडून गेले आहेत. सांगली शहरात तासभर ऊन्हात मुसळधार पाऊस पडला. शहराच्या अनेक सखल भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. मात्र,परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
हे ही वाचा -बिहारमध्ये पावसाचा हाहाकार, भिंत कोसळून ६ ठार, तर रिक्षावर झाड कोसळून चौघांचा मृत्यू