सांगली -जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या डफळापुर नजीक असणाऱ्या कुडनूर गावात एक खळबळ जनक घटना घडली आहे. शाळेमध्ये हॅन्ड ग्रॅनेड बॉम्ब सापडला ( Hand Grenade Found In School Sangli ) आहे. शाळेच्या मुलांना खेळत असताना एका खोलीमध्ये हा बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे एकच खळबड उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने धाव घेऊन हँड ग्रेनड बॉम्ब ताब्यात घेतला आहे.मात्र येथे हा बॉम्ब कसा आला ? त्याबाबत तपास सुरू झाला आहे.
शाळेमध्ये सापडला बॉम्ब - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापुर जवळील कुडनूर या गावी मराठी मुलांच्या शाळेमध्ये हॅन्ड ग्रॅनेड बॉम्ब सापडला आहे. शाळेची मुले बॉलने खेळत असताना खिडकीतून चेंडू आत गेल्याने तो चेंडू आणण्यासाठी मुले खोलीत गेले होते. त्यावेळी मुलांना बॉम्ब नजरेस पडल्या नंतर मुलांनी ग्रामस्थांनी याची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी शाळेमध्ये धाव घेतली होते, याची माहिती जर पोलिसांनाही देण्यात आली.