सांगली - जिल्ह्यातील दुष्काळाची काल पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी अचानकपणे भेट देत पाहणी केली आहे. अनेक दुष्काळी गावांना भेट देत चारा छावण्यांनाही त्यांनी भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाला टँकर व चारा उपलब्ध करून देण्याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना देशमुख यांनी दिल्या.
पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची केली पाहणी - पालकमंत्री सुभाष देशमुख
दुष्काळी परिस्थितिची पाहणी करण्यासाठी आचारसंहितेची कोणतीही अडचण नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्याना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
दुष्काळी परिस्थितिची पाहणी करण्यासाठी आचारसंहितेची कोणतीही अडचण नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्याना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचा दौरा करत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यामध्ये जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यांतील गावाना भेट देत त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.
आटपाडी तालुक्यातील तडवळे येथील चारा छावणीला भेट देत देशमुख यांनी जनावरांना दिल्या जाणाऱ्या चारा आणि पाण्याच्या व्यवस्थेची चौकशी केली. तसेच प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.