सांगली- जिल्ह्यातील नागरिकांना घरगुती वापराचा गॅस पाईपलाईनद्वारे सहजरीत्या उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात लवकरच घरगुती वापराचा गॅस पाईपलाईनद्वारे सहजरीत्या उपलब्ध केला जाणार आहे. त्यासाठी संबंधित भारत पेट्रोलियमच्या अधिकार्यांशी चर्चा झाल्याची माहिती जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळहून कर्नाटक राज्याकडे सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या भारत गॅसच्या एका पाईपलाईनमार्फत इस्लामपूर, आष्टा, सांगली मिरज कुपवड महापालिका क्षेत्रात पाईपलाईनद्वारे घरपोच आणि स्वस्त गॅस पुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
'सांगली जिल्ह्यात लवकरच मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस' - मंत्री जयंत पाटील बातमी
सांगली जिल्ह्यातील नागरिकांना घरगुती वापराचा गॅस पाईपलाईनद्वारे सहजरीत्या उपलब्ध होणार आहे. त्यासाठी संबंधित भारत पेट्रोलियमच्या अधिकार्यांशी चर्चा झाल्याची माहिती जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
तसेच या मार्गात येणाऱ्या गावांची सुद्धा मागणी असल्यास त्यांनाही पाईपलाईनद्वारे गॅस पुरविण्यात येईल. या आधुनिक पध्दतीचे सर्व नागरिक स्वागत करतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. या शिवाय पेट्रोल पंपवरदेखील भारत गॅस मार्फत सीएनजी गॅस पुरवठा सुरू केला जाईल जेणेकरून वाहतूक व्यवस्थेसाठी लागणारे इंधन कमी दरात उपलब्ध होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत सांगली जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , इस्लामपूर, आष्टा नगरपालिकेचे सीईओ या सर्वांची बैठक घेऊन भारत गॅस कंपनीला आवश्यक सर्व प्रशासकीय मदत करण्याच्या सूचना केल्या जातील. त्यानंतर 12 ते 15 महिन्यांत ही आधुनिक सुविधा जिल्ह्यातील तिनही महत्वाच्या शहरांना आणि तेथील नागरिकांना उपलब्ध होईल,असा आशावादही पाटील यांनी व्यक्त केला आहे.