शेतातून ट्रॅक्टर घातला म्हणून चौघांवर प्राणघातक हल्ला; दरीबडची तांडा येथील घटना - जत क्राईम न्यूज
जत तालुक्यातील दरीबडची संख रस्त्यावरील चव्हाण, राठोड, ठोंबरे यांची शेती आहे. या शेतीच्या वहिवाट तथा जाण्यावरून ठोंबरे व चव्हाण राठोड यांच्यात वाद आहे. बुधवारी शितल बाळू ठोंबरे यांनी शेताच्या कामासाठी ट्रॅक्टर आणला होता. हा ट्रॅक्टर आमच्या शेतातून का नेला, असे म्हणत ठोंबरे व चव्हाण राठोड यांच्यात वाद झाला.
सांगली - जत तालुक्यातील दरीबडची लमाण तांडा येथे शेतातून ट्रॅक्टर का घातला म्हणून चार जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यातील जखमी चौघा जणांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जत तालुक्यातील दरीबडची संख रस्त्यावरील चव्हाण, राठोड, ठोंबरे यांची शेती आहे. या शेतीच्या वहिवाट तथा जाण्यावरून ठोंबरे व चव्हाण राठोड यांच्यात वाद आहे. बुधवारी शितल बाळू ठोंबरे यांनी शेताच्या कामासाठी ट्रॅक्टर आणला होता. हा ट्रॅक्टर आमच्या शेतातून का नेला, असे म्हणत ठोंबरे व चव्हाण राठोड यांच्यात वाद झाला.
या वादातून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी सागर गुलाब चव्हाण गोरख मोहन राठोड नवनाथ लाल सिंह राठोड व एक अनोखळी या चौघांनी शितल ठोंबरे, भारत कोंडीबा ठोंबरे, बाळू कोंडीबा ठोंबरे, तानाजी भारत ठोंबरे या चौघांना चाकू आणि काठ्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. तर भारत ठोंबरे यांच्या पाठीत आणि पोटात गंभीर वार करण्यात आले आहेत. या प्रकरणी शितल ठोंबरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर 307 326 324 323 427 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते व सपोनि घोडके करत आहेत.