महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 4, 2021, 3:05 PM IST

Updated : Jan 4, 2021, 3:20 PM IST

ETV Bharat / state

ढगाळ वातावरणात पावसाच्या हलकी सरी; द्राक्ष बागायतदार हवालदिल

वातावरणातील बदलामुळे द्राक्षपिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच द्राक्षघडामध्ये पाणी साचून मणीघड कुजून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.

पावसाच्या सरी
पावसाच्या सरी

सांगली - ऐन हिवाळ्यात जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सांगली शहरासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे.


जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर अनेक तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत. सांगली शहरासह जिल्ह्यात हवेत गारठा निर्माण झाला आहे. तर वातावरणातील या बदलामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसणार आहे.

द्राक्ष बागायतदार हवालदिल

हेही वाचा-दिंडोरीत मध्यम स्वरुपाचा पाऊस; द्राक्ष उत्पादक धास्तावले

वातावरणातील बदलाने शेतकरी हवालदिल-

वातावरणातील बदलामुळे द्राक्षपिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच द्राक्षघडामध्ये पाणी साचून मणीघड कुजून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. मिरज आणि तासगाव तालुक्यातील शेतकरी या वातावरणातील बदलामुळे हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी आता आपल्या बागा वाचवण्यासाठी बागेत औषध फवारणी करण्यास सुरवात केली आहे.

हेही वाचा-इंदापूर तालुक्याच्या बोरी येथील द्राक्षांची परदेशात मागणी

द्राक्षबागा वाया जाण्याची भीती-
एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याच कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यातून शेतकरी सावरत असतानाच नवीन संकट निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरण आणि आज झालेल्या पावसाच्या सरीने हातातोंडाशी आलेली द्राक्ष बाग वाया जाईल का ?अशी शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे. आजच्या पावसाने द्राक्ष घडात पाणी साचून घड कुजू शकतात, असे राजू पाटील या शेतकऱ्याने सांगितले.

मुंबईसह रत्नागिरी जिल्ह्यात पावसची हजेरी
रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. पहाटे पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र, चिंता वाढली आहे. मुंबईशहरात देखील रविवारी रात्री पाऊस झाला. त्यामुळे मुंबईच्या तापमानात घट झाल्याची नोंद झाली आहे.

Last Updated : Jan 4, 2021, 3:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details