सांगली -अहमदनगरचे नाव बदलून 'अहिल्यानगर' ( Gopichand Padalkar on Ahilyanagar ) करावे अशी मागणी ( Ahmednagar name change to Ahilyanagar demand ) भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या मागणीचे पत्र पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Gopichand Padalkar letter to CM ) यांना पाठवले आहे. तसेच नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल, असे आवाहन देखील पडळकर यांनी केली.
हेही वाचा -Sangli Crime News : कानाखाली मारल्याच्या रागातून अंडाभुर्जी चालकाचा खून; पाच आरोपी ताब्यात
आमदार गोपीचंद पडळकर ( Ahmednagar name change demand Gopichand Padalkar ) यांनी पत्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा उल्लेख करत नामांतराची मागणी केली आहे. पत्रात, अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण देशाच्या प्रेरणास्थान आहे. मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरे लुटली जात होती तेव्हा अहिल्यादेवींनी हिंदूसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवींचा ज्या जिल्ह्यात जन्म झाला त्या अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करावे अशी लोकभावना आहे. त्यामुळे, तुम्ही कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार, मुघलशाही की होळकरशाही, असा प्रश्न विचारत पडळकर यांनी नामांतराच्या विषयावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.