महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Father Son Kidnapping : बाप-लेकाचे अपहरण करत 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीला बेड्या - सांगली बाप लेकाचे अपहरण

बाप-लेकाचे अपहरण (Father and Son kidnapping) करत 50 लाख रुपयांची खंडणी (50 lakh ransom) मागितल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आष्टा येथील बाप-लेकाचे अपहरण करून त्यांना कसबे डिग्रज या ठिकाणी आणले. त्यानंतर मारहाण करत खंडणी देण्याच्या कबुलीनंतर त्यांना सोडण्यात आले.

sangli police
सांगली पोलिसांकडून आरोपीला अटक

By

Published : Mar 19, 2022, 10:17 PM IST

Updated : Mar 19, 2022, 10:28 PM IST

सांगली - बाप-लेकाचे अपहरण (Father and Son kidnapping) करत 50 लाख रुपयांची खंडणी (50 lakh ransom) मागितल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आष्टा येथील बाप-लेकाचे अपहरण करून त्यांना कसबे डिग्रज या ठिकाणी आणले. त्यानंतर मारहाण करत खंडणी देण्याच्या कबुलीनंतर त्यांना सोडण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी (Sangli Rural Police) गतीने तपास करत अवघ्या 12 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी

बाप-लेकाचे अपहरण करत 50 लाखांची मागणी -

सांगलीच्या आष्टा येथील शिक्षक शिवाजी यशवंत ढोले आणि त्यांचा मुलगा पियुष या दोघांचे अपहरण करून त्यांना मारहाण कारण्यात आल्याचा प्रकार 15 मार्च रोजी घडला होता. त्यानंतर दोघा बाप-लेकाला गाडीतून सांगलीनजीकच्या कसबे डिग्रज याठिकाणी नेऊन एका खोलीमध्ये ठेवत मारहाण करण्यात आली..त्यांच्याकडील असणारे पैसे, दागिने काढून घेत जिवंत राहण्यासाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. जिवाच्या भितीने दोघांनी 50 लाख रुपये द्यायची कबुली दिल्यानंतर त्या दोघांना अपहरणकर्त्यांनी सोडले होते.

असे घडले अपहरण नाट्य -

पीडित शिवाजी ढोले हे काकाचीवाडी येथील सेवा सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आष्ट्यात जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षक आहेत. शिवाजी ढोले आणि त्यांचा मुलगा पियुष हे दोघे एका ढाब्यावर जेऊन आष्टामार्गे सांगलीकडे निघाले होते. रात्री 10 च्या सुमारास कसबे डिग्रज हद्दीत एक पांढर्‍या रंगाची कार त्यांच्या समोर येऊन अचानक थांबली. त्यापाठोपाठ आणखी एक कार येऊन थांबली. दोन्ही गाड्यांमधून चेहर्‍याला रुमाल बांधलेले सुमारे 10 लोक भरभर उतरले. त्यानंतर ढोले बाप-लेकावर अंगावर गुलाल टाकू लागले. ढोले यांनी त्यांना हा कसला गुलाल आहे असे विचारले असता, त्यांना शिवीगाळ करत “चल तुला, कसला गुलाल आहे सांगतो”असे म्हणत मारहाण करून कारमध्ये बसवले. सुमारे दोन तासांच्या प्रवासानंतर एका अज्ञातस्थळी असणाऱ्या एका खोलीत नेऊन मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील 22 हजार रुपये काढून घेत, जिवंत राहायचे असेल तर 50 लाखांची खंडणी देण्याची मागणी केली. ढोले यांनी 50 लाख देण्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांना पुन्हा डोळ्यावर रूमाल बांधून अज्ञात स्थळी सोडून देण्यात आले.

12 तासात 5 जणांना अटक -

त्यानंतर ढोले बाप-लेकाने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून सदर प्रकरणाची सर्व माहिती दिली. यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत गतीने तपास सुरू केला. अवघ्या 12 तासांमध्ये खंडणी मागणाऱ्या टोळीला गजाआड केले. त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी दिली आहे.

Last Updated : Mar 19, 2022, 10:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details