महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत चार रुग्ण कोरोनामुक्त तर एकास लागण, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 47 वर

शनिवारी (दि. 30 मे) सांगली जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला तर चार रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात 47 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत.

file photo
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : May 31, 2020, 7:08 AM IST

सांगली- जिल्ह्यात शनिवारी (दि. 30 मे) आणखी एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. मुंबईहून आलेल्या जत तालुक्यातील औंढी येथील ती व्यक्ती आहे. तर चार कोरोनाबाधित रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही 47 झाली आहे.


सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोराना बाधीत रुग्ण कोरोनामुक्तही सुद्धा होत आहेत. सांगली जिल्ह्यात शनिवारी जत तालुक्यातील औंढी येथे मुंबईहून आलेल्या आणखी एक व्यक्तीला कोरोना लागण झाली आहे. त्याच गावातील दोघांना शुक्रवारी (दि. 29 मे) मध्यरात्री कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्या संपर्कातील हा व्यक्ती आहे. संबंधित व्यक्तीस मिरजेच्या कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे.

शनिवारी (दि. 30 मे) कोरोनावर उपचार घेणारे चार बाधित रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये मिरजेच्या भारत नगर येथील 30 वर्षीय महिला, धारावी येथून जिल्ह्यात आलेली 37 वर्षीय महिला, आटपाडी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील 33 वर्षीय तरुण आणि आटपाडीच्या सोनारसिद्ध नगर मधील 26 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्या चौघांना मिरज येथील कोव्हिड रुग्णालयातून डिस्चार्ज देत 14 दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे. तर शनिवारी आढळलेले कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुक्त झालेले रुग्ण यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही 47 झाली आहे.

शनिवारपर्यंत (दि.30 मे) सांगली जिल्ह्यात 110 कोरोना रुग्णांची नोंद झाली,असून त्यापैकी 59 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे..

हेही वाचा -सांगलीत आजी-माजी आमदारांच्या कारखान्यांचा लिलाव, जिल्हा बँकेची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details