महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण - सदाभाऊ खोत कोरोना लागण

तीन दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत यांना शंका आल्याने त्यांनी स्वत: जाऊन इस्लामपूर येथील आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करून घेतली होती. मंगळवारी त्यांचा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला. मात्र, कोरोनाची तीव्र लक्षणे त्यांच्यात नसल्याने डॉक्टरांनी त्यांना क्वारंटाईन होण्याच्या सूचना देत घरीच त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.

Sadabhau Khot
सदाभाऊ खोत

By

Published : Aug 26, 2020, 1:44 PM IST

सांगली -माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.

तीन दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत यांना शंका आल्याने त्यांनी स्वत: जाऊन इस्लामपूर येथील आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करून घेतली होती. मंगळवारी त्यांचा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला. मात्र, कोरोनाची तीव्र लक्षणे त्यांच्यात नसल्याने डॉक्टरांनी त्यांना क्वारंटाइन होण्याच्या सूचना देत घरीच त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनासुद्धा होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान, एमआयएमपक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांनाही कोरोना झाला आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावरही घरातच उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details