सांगली :महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे भूत हे काँग्रेसने निर्माण केलेले 'भूत' असल्याचा आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. पन्नास वर्षे काँग्रेसचे राज्यात आणि देशांमध्ये सत्ता होती. मग हे भूत का गाडता आले नाही ? असा सवाल सदाभाऊ खोत (Former Minister Sadabhau Khot) यांनी उपस्थित केला आहे.
Sadabhau Khot Criticized Congres : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काँग्रेसने निर्माण केलेले भूत - सदाभाऊ खोत - Former Minister Sadabhau Khot
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून कॉंग्रेसवर टीका केली (Sadabhau Khot on Maharashtra Karnataka Borderism) आहे. सीमावादाचे भूत हे काँग्रेसने निर्माण केलेले 'भूत' असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कॉंग्रेस कर्नाटकमधल्या महाराष्ट्रीयन जनतेची फसवणूक करणार आहे, अशी टीका त्यांनी (Sadabhau Khot Criticized Congres) केली.
न्याय मिळाला पाहिजे :आता सीमावादावर तापलेल्या तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रवादी आणि इतर पक्ष आपली पोळी भाजून घेण्याची भूमिका समोर आली आहे. शिवा भागातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, याच्याशी दुमत असायचे कारण नाही, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सीमाभागाला आणि गावांना जर खरच न्याय द्यायचा असेल, तर त्यांना माझे आव्हान (Sadabhau Khot Criticized Congres) आहे.
महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढाई : काँग्रेस आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या आमदार-खासदारांची बैठक घेऊन सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्याबाबत ठराव घ्यावा. मग आम्ही मानू तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढाई करत आहे. पण ते त्यांच्याकडून होणार नाही. याउलट काँग्रेसचे कर्नाटकचे आमदार-खासदार एक इंच जमीन देणार नसल्याचे सांगत आहेत. इथली काँग्रेस महाराष्ट्राच्या लोकांवर कर्नाटकमध्ये अन्याय होत असल्याबाबत गळा काढत आहे, हे सर्व दुटप्पी असून हा सर्व प्रकार कर्नाटकमधल्या महाराष्ट्रीयन जनतेची फसवणूक करणार आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली (Sadabhau Khot on Maharashtra Karnataka Borderism) आहे.