सांगली - आयुष्यात राजू शेट्टींना दुसऱ्याचे चांगले चिताईची बुद्धी परमेश्वर देवो, अशा शब्दांत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना खोचक टोला लगावला आहे. तसेच शेट्टींनी मिळणाऱ्या आमदारकीचे स्वागत करत आपण कोणाच्या आड मांजर सोडत नाहीत. मात्र, त्यांच्या पाठीवरचे मांजरांचे पोते आहे, अशा शब्दांत आमदार खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोट्यातून आमदारकीसाठी ऑफर मिळाली आहे. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदारकी मिळत असेल तर त्याचे आम्ही स्वागत करतो. कारण, चळवळीतला कार्यकर्त्याने विधानसभेत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजे. मात्र, आम्हाला प्रश्न हा आहे की? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ऊसाचा दरावरून पंढरपुरमधून पांडुरंगाला साकडे घालून पायी बारामती ज्यांच्या दारी जाऊन बसलो आणि त्या आंदोलनात शेतकऱ्यांना, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात लाठ्या-काठ्या खाव्या लागल्या, याचा विसर राजू शेट्टींनी नको व्हायला होता, असेही खोत म्हणाले.