सांगली -राज्यात शेतीमाल खरेदी करण्यात कृषी खाते अपयशी ठरले असून या सरकारलाच कोरोना झाल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. केंद्र सरकारने शेतीमाल नियमन मुक्त केल्याच्या निमित्ताने बिचूद येथे खोत यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
'कृषी खाते झोपेत, तर सरकारलाच झालाय कोरोना'
केंद्र सरकारने शेतीमाल नियमन मुक्त केल्याच्या निमित्ताने बिचूद येथे माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उत्पादन संपूर्ण देशात कुठेही विकता येणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधताना, सरकारने शेतमाल अद्याप खरेदी न केल्याने तो पडून असल्याचा आरोप त्यांनी केला. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला. या परिस्थितीत कृषी विभाग सक्षम असणे गरजेचे होते. मात्र कृषी आणि पणन विभाग झोपलेल्या अवस्थेत असून केवळ राज्य सरकारचे आरोग्य आणि गृहखाते काम करत आहे, असे खोत यांनी म्हटले. सरकारला कोरोना झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली.