महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

... अन्यथा आंदोलन छेडु - राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा - सांगली

सांगली - भीषण दुष्काळी स्थिती पाहता मुबलक पाणी आणि जनावरांना चारा, खाद्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्याक्ष अविनास पाटील आणि अन्य

By

Published : May 9, 2019, 4:52 PM IST

सांगली- भीषण दुष्काळी स्थिती पाहता मुबलक पाणी आणि जनावरांना चारा, खाद्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तसेच फळ बागयातदार शेतकऱ्यांना पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी अनुदान देण्याची मागणी करत दुष्काळाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील


जिल्ह्यातील वाढत्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष आणि दुष्काळी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्तांच्या विविध समस्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या.


प्रामुख्याने चारा छावण्यात देण्यात येणारा चारा आणि खाद्य कमी प्रमाणात मिळत आहे. परिणामी जनावरांच्या प्रकृती खालावत आहे. यामुळे जनावरांना मुबलक चारा आणि खाद्य उपलब्ध करून घ्यावा. अनेक ठिकाणी चारा छावण्या अजून सुरू झाल्या नाहीत त्या ठिकाणी त्वरित छावण्या सुरू कराव्यात. तसेच अनेक गावात पाण्याची टंचाई आहे, जिल्हातील टँकरने पाणी पुरवठा सुरू असून तो अपुरा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती मागे ४० लिटर पाणी द्यावे.


पाण्याच्या आभावी फळशेती मोठ्या प्रमाणात पाण्याअभावी सुकून जात असल्याने बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी प्रति जनावर १२० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने दुष्काळाची व्याप्ती पाहता दुष्काळी मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details