चांदोलीत 156 मिलीमीटर पाऊस, वारणा - कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ
तालुक्यातील शिराळा येथील चांदोली येथे अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. चांदोली याठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात 195 मिलिमीटर इतक्या पाऊसाची नोंद झाली आहे.
सांगली - संततधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील वारणा नदीच्या पाण्याच्या पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होवून पातळी 21 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर तालुक्यातील शिराळा येथील चांदोली येथे अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणी वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. चांदोली याठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात 195 मिलिमीटर इतक्या पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. 34 टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या धारणात 28.12 टीएमसी पाणी साठा झाला असून धरण 80 टक्के भरले आहे आहे. त्यामुळे धरणातून 1,400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर संततधार पडणार पाऊस आणि धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. शिराळा तालुक्यातील काखे-मांगले पूल,तसेच कोकरूड-रेठरे, आणि सावर्डे-मांगले बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
दुसऱ्या बाजूला सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मंगळवारी 5 फूट असणारी पाणी पातळी ही बुधवारी रात्री 17 फुटांवर पोहोचली होती आणि आज गुरुवारी सकाळी 10 वाजता ती 21 फुटांवर पोहोचली. तसेच हळूहळू या पातळीत वाढ सुरूच होती. या वाढत्या पाणीच्या पातळी मुळे कृष्णा नदीवरील असणारे बहे, डिग्रज, सांगली, आणि म्हैसाळ व राजापूर येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.