सांगली- सांगली शहरात महापुराने थैमान घातला आहे. संपूर्ण शहर पाण्याखालील गेले आहे. या महापुरात अद्यापही नागरिक अडकले आहेत. तर नागरिकांना सामाजिक कार्यकर्ते युध्दपातळीवर बोट, होडीच्या सहाय्याने बाहेर काढत आहेत. त्याबरोबर साधन सामुग्रीही पुरवत आहेत. या जलमय सांगली शहराचा बोटीतून आढावा घेतलायं आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी.
महापुराने सांगली जलमय : 'ईटीव्ही भारत'ने बोटीतून घेतला पूराच्या स्थितीचा आढावा - महापुर
पुरामुळे वारणा आणि कृष्णाकाठच्या शंभरहून अधिक गावांना महापुराचा विळखा पडलेला आहे. त्यामुळे, नदीकाठच्या 70 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
पुरामुळे वारणा आणि कृष्णाकाठच्या शंभरहून अधिक गावांना महापुराचा विळखा पडलेला आहे. त्यामुळे, नदीकाठच्या 70 हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यासोबतच हजारो जनावरांचे देखील स्थलांतर करण्यात आले आहे. पूर परिस्थिती पाहता, या ठिकाणी आता लष्कराला सुद्धा पाचारण करण्यात आले आहे.
पुराची पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि लष्कराला पाचारण करण्यात आले असून, एनडीआरएफच्या तीन तुकड्या आणि लष्कराची एक तुकडी याठिकाणी दाखल झाली आहे. नदीकाठी पुरात अडकलेल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.