महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिस्तुल तस्कर गजाआड; 5 पिस्तुल, 15 जिवंत काडतुसांसह 5 मॅगझीन जप्त

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पिस्तुल तस्करी करणाऱ्या दोघांना गजाआड करत 5 देशी बनावटीच्या पिस्तुलसह 15 जिवंत काडतुसे आणि 5 मॅगझीन जप्त केले आहेत.

5 पिस्तुल, 15 जिवंत काडतुसांसह 5 मॅगझीन जप्त करण्यात आले.

By

Published : Oct 18, 2019, 8:37 PM IST

Updated : Oct 18, 2019, 9:39 PM IST

सांगली -आटपाडी येथे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पिस्तुल विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 देशी बनावटीचे पिस्तुल, 15 जिवंत काडतुसे आणि 5 मॅगझीन जप्त करण्यात आले आहेत.

जप्त केलेली पिस्तुलं, काडतुसं आणि मॅगझीन

हेही वाचा - आमदार घरचा हवा की बाहेरचा, राज ठाकरेंचा कोथरुडकरांना सवाल

सांगलीच्या देवा उर्फ देवेंद्र सांगवे (वय 24, रा. चिंचवड, पुणे) आणि बाला उर्फ बालाजी आदाटे (वय 22, रा. आटपाडी, सांगली) अशी या तरुणांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला आटपाडीमार्गे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याकडे एका सिल्व्हर कलरच्या एर्टीग गाडीतुन पिस्तुल तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस पथकाने आटपाडी ते नाझरे यामार्गावर सापळा रचून संशयित एर्टीग गाडीला थांबवून झडती घेतली. यावेळी ड्रायव्हर सीटच्या खाली 5 पिस्तुल, 15 जिवंत काडतुसे आणि 5 मॅगझीन आढळून आले,यावेळी पोलिसांनी सर्व मुद्देमाल व गाडी असा एकूण 9 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करत दोघा तरुणांना अटक केली.

हेही वाचा - पाच दिवसांपासून नाशिकच्या HAL कर्मचाऱ्यांचा संप सुरू; शरद पवारांनी घेतली कर्मचाऱ्यांची भेट

Last Updated : Oct 18, 2019, 9:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details