सांगली -लॉकडाऊनमध्ये लग्न करणे मिरजमधील एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने, महापालिकेने मंगल कार्यालयाच्या मालकाकडून 50 हजारांचा दंड वसूल केला आहे.
सध्या सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यामध्ये पाच मे पासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. तर कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये नियम व अटी घालून केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र लग्नाला 50 पेक्षा अधिक जण उपस्थित राहिल्याने, महापालिकेच्या वतीने 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.